Tiranga Times Maharastra
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं असून मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना ठाकरे गटाच्या हातातून गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता या निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.
महापालिका निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही.
निकालांवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वच महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला आपण जाऊ शकलो नाही. मात्र मुंबई, म्हाडा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रचारासाठी गेलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले असून परभणीमध्येही पक्षाला समाधानकारक यश मिळालं आहे. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याचं मान्य करत त्यांनी या निकालाचं आत्मपरीक्षण केलं जाईल, असंही संकेत दिले.
